YOUR DATA. WITH RESPECT.

गोपनीयता धोरण.

Vconstro वेबसाइटवर तुमच्या माहितीचा वापर कसा होतो याची सोपी माहिती.

ही वेबसाइट Vighnaharta Engineers & Associates Latur यांच्या सेवा, प्रकल्प आणि बांधकामासंबंधी प्राथमिक माहिती देण्यासाठी आहे.

संपर्क फॉर्म आणि WhatsApp

नाव, मोबाईल नंबर, अपेक्षित सेवा आणि तुम्ही दिलेली प्लॉट / साइटची माहिती वापरून तुमच्या ब्राउझरमध्ये WhatsApp मेसेजचा मसुदा तयार होतो. तो WhatsApp वर तपासून पाठवण्याचा निर्णय तुम्ही घेता. ही वेबसाइट स्वतः संपर्क फॉर्मची माहिती database किंवा local storage मध्ये जतन करत नाही. WhatsApp / Meta च्या सेवेसाठी त्यांची गोपनीयता धोरणे लागू होतात.

कॅल्क्युलेटर

प्राथमिक अंदाज तुमच्या ब्राउझरमध्येच मोजला जातो. क्षेत्रफळ किंवा निवडलेलं package तुम्ही WhatsApp वर शेअर केल्याशिवाय Vconstro ला पाठवलं जात नाही.

वेबसाइट वापराचे मोजमाप

वेबसाइटवरील वापर समजण्यासाठी Google Analytics 4 वापरलं जातं. Page views, कोणता material calculator वापरला, कॉल किंवा WhatsApp उघडण्याचे प्रयत्न, लेख वाचताना सक्रिय वेळ व scroll आणि पत्रिका छापण्याची कृती यांसारख्या वापराच्या घटनांची मोजणी होऊ शकते. Click किंवा तयार मसुदा म्हणजे प्रत्यक्ष संपर्क किंवा निश्चित inquiry झालेली आहे असे मानले जात नाही. आमच्या custom analytics events मध्ये calculatorमधील मापं किंवा निकाल, नाव, मोबाईल नंबर, साइटचं ठिकाण किंवा मेसेज पाठवला जात नाही. Calculator वापरल्याच्या eventमध्ये फक्त पाचपैकी कोणता tool वापरला हे नोंदले जाते. Google Analytics कडून cookies किंवा इतर तांत्रिक identifiers वापरले जाऊ शकतात. तुमच्या ब्राउझरमध्ये Do Not Track सुरू असल्यास analytics tracking code लोड होत नाही. Google चे गोपनीयता धोरण.

App आणि offline वापर

वेबसाइट होम स्क्रीनवर जोडल्यास सार्वजनिक वेबसाइट फाईल्स ब्राउझरमध्ये cache होऊ शकतात. संपर्क फॉर्मची माहिती offline cache मध्ये साठवली जात नाही.

तुमचे प्रश्न

माहितीच्या वापराबद्दल किंवा आधीच्या संवादाबद्दल काही प्रश्न असल्यास +91 90966 99962 वर संपर्क करा. Shop No 1 to 3, Rajiv Gandhi Chowk, behind Chwonda Complex, Shahupuri Colony, Ram Nagar, Latur, Maharashtra 413531.